भक्तांना हात लावाल तर खबरदार! : अमित शाह

तिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केरळमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी केलेल्या एका विधानामुळे या असंतोषाला खतपाणी घातले जाण्याची शक्यता आहे. ते शिवारी कन्नूर येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी अमित शहा यांनी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या भक्तांचे जाहीरपणे समर्थन केले.

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, यासाठी तेथील भक्तगण एकत्र येत आहेत. या वादात पोलिसांनी आत्तापर्यंत 2061 जणांना अटक केली आहे. महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, तेथील भक्तगण सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य करत नसल्याचे दिसून येते. त्यातूनच, अद्यापही तेथील महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत आहे.

केरळमधील डाव्यांचे सरकार अय्यप्पा भक्तांचे आंदोलन जबरदस्तीने दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदूंच्या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याची मोठी किंमत केरळ सरकारला चुकवावी लागेल, असे अमित शहांनी म्हटले. भाजप या भक्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध म्हणून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्या भक्तांनाही हात लावला तर भाजप पिनराई विजयन सरकारला उद्ध्वस्त करेल, असा इशारा यावेळी अमित शहांनी दिला.

शबरीमला प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचा सध्या आगीशी खेळ सुरू आहे. केरळ सरकारने आत्तापर्यंत भाजपा, आरएसएस आणि इतर पक्षांच्या मिळून 2 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मात्र, या सर्वात नुकसान कोणाचं होत आहे ? तुम्ही जर अयप्पा भक्तगणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत असाल, तर उद्या देश त्यांच्या बाजुने उभा राहिल, असेही शहा यांनी म्हटले.

‘भाडे के टट्टू  चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश

गौरी लंकेशची हत्या आणि उजवे