काश्मिरातलं कलम 370 हटवा म्हणजे गळा भेट घेता येईल

‘सामना’तून पंतप्रधान मोदींना उपहासात्मक टोमणा .

ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असं म्हणत तणावग्रस्त जम्मू काश्मीरवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल होत . मोदींच हे विधान शिवसेनेला फारस रुचलेल दिसत नाही.सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींवर जोरदार उपहासात्मक टीका करण्यात आली आहे .

‘सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा” असा उपहासात्मक टोमणा मारताना काश्मिरातलं कलम 370 हटवा म्हणजे सर्व जनता काश्मिरात जाऊन तिथल्या लोकांची गळा भेट घेईल, असाही टोला लगावण्यात आला.

मोदींच्या भाषणाचा सामनामधून असा समाचार घेण्यात आला आहे.

कश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल.‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या काहल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचलानाही याचेच आश्चर्य वाटते. आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा. कश्मीरातील ३७० कलमलगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी कश्मीरात जातील व तेथील लोकांच्यागळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचेआम्ही स्वागत करीत आहोत!

 

You might also like
Comments
Loading...