#सामना_रोखठोक:…तर पंतप्रधान मोदींवर देखील राजीनाम्याची वेळ येऊ शकते!

sanjay raut amit shah modi

मुंबई: गेले ४ महिने देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी अनेक देशांप्रमाणे भारतात देखील लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला. त्यानुसार जून पर्यंत सर्वच व्यापार-उद्योग ठप्प होते. त्यानंतर अनलॉक अंतर्गत थोड्या फार प्रमाणत उद्योग धंदे सुरु होत असले तरी मधल्या काळात अचानक संपूर्ण आर्थिक चक्र थांबल्यामुळे कोटयवधी लोकांना रोजगार गमवावा लागला होता.

तर, अनेक मजूर जीवाची परवड करत आपापल्या गावी पोहोचत होते. आता, त्यांच्या हाताला काम नाही. एवढेच काय कित्येक मध्यम व लघु उद्योग डबघाईला आले आहेत.या लोकांच्या समस्यांचे निराकरण केले नाही तर कदाचित देशातील जनता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागेल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. ‘सामना’तील रोखठोक या सदरात सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोना काळातील केंद्र सरकार आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

मुंबईत लवकरच अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार,मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

यासाठी संजय राऊत यांनी इस्रायलचा दाखला दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू हे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत. आर्थिक डबघाई आणि कोरोनासंदर्भातील अपयश यामुळे संतापलेल्या इस्रायली जनतेने जागोजागी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरु केली आहेत. इस्रायलची जनता पंतप्रधान नेत्यानाहूंचा राजीनामा मागत आहे. ही वेळ हिंदुस्थानवरही येऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली: सुशील कुमार मोदी

तसेच, रामाचा वनवास भक्तांनी संपवला असला तरी सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे हे आपले पंतप्रधानसुद्धा मान्य करतील. जीवनासंबंधी एवढी विवंचना आणि असुरक्षितता आजपर्यंत कधी कुणाला वाटली नसेल. कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या देशात 10 कोटी लोक रोजगार गमावणार आहेत. हा वरवरचा आकडा आहे. ‘कोरोना मंदी’मुळे किमान 40 कोटी कुटुंबांच्या उपजीविकेवर आक्रमण होईल असा माझा अंदाज आहे. चार लाख कोटींचा फटका व्यापार उद्योगास बसला आहे.

‘कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा’

त्यात लहान व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात आहेत. लोकांच्या संयमालाही मर्यादा आहेत. नुसत्या आशेवर आणि आश्वासनांवर लोकांनी कुठवर दम काढायचा? गेल्या पंधरा वर्षांत लोकांची एकही अडचण दूर झाली नाही. उलट अडचणी वाढत गेल्या. कोरोनामुळे आज जगायचे कसे, हा एकच प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून प्रत्येक घरात उभा ठाकला आहे, अशी परिस्थिती देखील संजय राऊत यांनी मांडत टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, त्यांनी विदारक परिस्थिती अत्यंत रोखठोकपणे मांडली आहे. ते म्हणतात, “आज देशातली सामाजिक व आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे? एका वाक्यात सांगायचे तर, लोक स्वतःला ‘गुलाम’ म्हणून विकायला तयार होतील. पूर्वी फिजी, मॉरिशस, गयाना, सुरिनाम अशा बेटांवर इंग्रजांनी हिंदुस्थानींना गुलाम म्हणून नेले. तसे ‘गुलाम’ म्हणून जायला लोक तयार होतील याचे भान आमच्या राज्यकर्त्यांना नसेल तर त्यांनी राफेलचे उत्सव साजरे करावेत.”

IMP