मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असून त्यांची मुलगी आज(२९ नोव्हें.) विवाहबद्ध होणार आहे. तिच्या लग्नपत्रिकेवर #PMkishadi असे लिहिण्यात आले आहे.अर्थातच नव्या जोडप्याच्या नावाची ही पहिली अक्षर आहेत. एकीकडे हे सुरु असतांनाच दुसरीकडे आपल्या सामनाच्या अग्रलेखात राऊतांनी पंतप्रधान मोदींवर(PM Narendra Modi) टिका करण्याची संधी सोडलेली नाही.
राऊत लेखात म्हणाले आहेत की, पंतप्रधान मोदी यांनी संविधान दिनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण दिले. याच हॉलमध्ये स्वातंत्र्याशी नियतीचा करार झाला. मोदी आता नवी संसद निर्माण करीत आहेत. या संसदेत ‘सेंट्रल हॉल’च नाही. त्यामुळे पुढच्या ‘संविधान दिनी’ पंतप्रधान भाषण करणार कुठे?
पुढे ते म्हणाले की,’संविधान दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे महनीय विचार प्रकट केले आहेत. त्यात शुद्ध विचार किती व राजकीय विरोधकांवर हल्ले किती ते पाहावे लागेल. शुक्रवारी देशात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदी यांनी ‘नाव’ न घेता काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणतात, ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ हे लोकशाहीला घातक आहे. संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले. आता देशहित मागे पडले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. मोदी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर काँग्रेससह बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त स्वपक्षाच्या खासदारांसमोरच बोलले. संविधान दिनाचे महत्त्व लक्षात घेतले तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?
दरम्यान, गेल्या दहा वर्षांत काँगेस राजकीयदृष्टय़ा दुर्बल झाली आहे. अशा दुर्बल झालेल्यांवर वारंवार आपले पंतप्रधान टीका करतात. याचा सरळ अर्थ असा की, पंतप्रधान मोदी यांना अजूनही काँगेसचे भय वाटते व भाजपला राष्ट्रीय स्तरावर पर्याय हा काँग्रेसच असू शकतो हे त्यांचे अंतस्थ मत आहे. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काम सुरू केले आहे व त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसवर हल्ले करणे संयुक्तिक आहे. पंतप्रधान मोदी यांना राजकारणाचे चांगले ज्ञान आहे. ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’ या संकल्पनेवर त्यांनी टीका केली; पण संविधानाला सगळय़ात मोठा धोका लोकशाही माध्यमातून सत्तेवर यायचे व मग हुकूमशाही पद्धतीने राज्य करायचे या प्रकारच्या प्रवृत्तींपासून आहे. काँग्रेस हा लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या विचारधारेशी मतभेद असू शकतात; पण काँगेसने आजच्याप्रमाणे बाजारात विकायला काढले नव्हते, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल