पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? : ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही असं म्हणत संघ आणि भाजपवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शरसंधान करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दिल्लीत तीन दिवसांची एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ही व्याख्यानमाला हिंदुस्थानचे भविष्य वगैरे अशा विषयांवर होती .या व्याख्यानमालेत सरसंघचालक भागवत यांनी जे वेगवेगळे विचार मांडलेत्याचा खरपूस समाचार अग्रलेखातून घेण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात

सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण 370 कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्लीत सांगितले की, अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर व्हायला हवे. संघातर्फे दिल्लीत तीन दिवसांची एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ही व्याख्यानमाला हिंदुस्थानचे भविष्य वगैरे अशा विषयांवर होती. व्याख्यानमाला संपल्यावर सरसंघचालकांनी लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली. राम मंदिराचे काय होणार, हा प्रश्न पुन्हा चिघळवला जात आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यात मतांचे धुवीकरण होईल व भाजपच्या जागा वाढतील असे एकंदरीत राजकीय गणित आहे. 370 कलमाबाबत आमची भूमिका स्पष्ट असल्याचे भागवत म्हणतात. 370 कलम हटवल्याशिवाय कश्मीर हा हिंदुस्थानचा भूभाग होणार नाही अशी संघाची भूमिका होती व त्या मतांशी ते कायम असतील तर 370 कलम हटविण्यास विरोध करणार्या मेहबुबा मुफ्तीसोबत कश्मिरात भाजपने सरकार स्थापन केले त्याचे काय? 370 कलम हटवले तर दंगे उसळतील असे मेहबुबांचे सांगणे होते. तरीही तिच्याशी सत्तेसाठी निकाह लावणे योग्य होते काय व हा निकाह लावण्यात ‘काझी’ची भूमिका पार पाडणारे राम माधव यांच्यासारखे संघ स्वयंसेवकच होते. राम मंदिर व्हायला हवे असे

सरसंघचालक सांगतात

ते दिल्लीतील मोदी सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे, पण राम मंदिर हा प्रचाराचा आणि निवडणुकीचा मुद्दा बनला आहे आणि त्यामुळे हिंदुत्व चेष्टेचा विषय बनत चालला आहे. उत्तरेतील एका भाजपच्या नेत्याने तर अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, खुद्द पंतप्रधान मोदीही हादरले असतील. सुप्रीम कोर्टात भाजपचे वजन आहे. त्यामुळे राम मंदिरप्रश्नी आम्ही न्यायालयातून पाहिजे तसा आदेश घेऊन येऊ. राम मंदिराचा प्रश्न हा अशा काही मंडळींनी इतक्या खालच्या थराला नेऊन ठेवला आहे. राम मंदिर हा सेटिंग, मांडवली किंवा व्यापार आहे काय हे आधी स्पष्ट व्हायला हवे. सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण 370 कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेल 100 रुपयाला स्पर्श करीत आहे. कश्मीरच्या सीमेवर आमच्या सैनिकांची मुंडकी उडवली जात आहेत. त्यावर कुणी का बोलत नाही? पेट्रोल, डिझेलची

महागाई आणि जवानांचे शिरच्छेद

हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही. गोरक्षणाच्या नावावर जो उन्माद झाला, माणसे मारली गेली. त्याच्याशी संघाचा संबंध नाही असे श्री. भागवत यांनी सांगितले, पण गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी हिंसा करायला रस्त्यावर उतरल्या तेव्हा हिंदू मतांच्या धुवीकरणाची नवी पहाट उगवल्याच्या आनंदात सगळे बेहोश झाले. गाय, गोवंश वगैरेंचा संबंध हिंदुत्वापेक्षा शेतकर्यांच्या अर्थकारणाशी आहे हे त्यावेळी एखाद्या ज्येष्ठाने समजावून सांगितले असते तर शेतकर्यांचे भले झाले असते. गोरक्षकाच्या झुंडशाहीमुळे गोवंशाचा बाजार, व्यापार थंडावला. गोवंशांची वाहतूक कोणी करत नाही. त्याचा परिणाम दुधाच्या किरकोळ व्यापार्यांवर झाला. या स्थितीत सामान्य माणसांचेच खायचे वांदे झाले तेथे भाकड गाई-बैलांची काय कथा? उलट त्यांच्यासाठी आता शेतकर्यांना तजवीज करावी लागत आहे. हे चित्र हिंदूंच्या भविष्यासाठी बरे नाही. देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये.

You might also like
Comments
Loading...