‘साहो’ चित्रपट होणार ‘या’ दिवशी रिलीज

टीम महाराष्ट्र देशा : बाहुबली स्टार प्रभास आता त्याच्या ‘साहो’ चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रभाससह श्रद्धा कपूर देखील झळकणार आहे. श्रद्धाने अनेक ‘साउथ इंडियन’ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

‘साहो’ चित्रपट १५ ऑगस्ट ला रिलीज होणार आहे. १३ जून ला ट्रेलर रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातून प्रभास आणि श्रद्धा यांची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर प्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘साहो’ या चित्रपटातील रोमांटिक गाण्याच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे, या गाण्याचे चित्रीकरण ऑस्ट्रियाला करण्यात येणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी ‘साहो’ चित्रपटाची टीम पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रियाला जाणार आहे. या गाण्याच्या चित्रिकरणासोबतच चित्रपटातील काही शॉट्सदेखील चित्रित केले जाणार, अशी माहिती सूत्रांन कडून मिळाली आहे.