कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती… एस. श्रीसंतचे संघात पुनरागमन होणार

s. Sreesanth

नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेला गोलंदाज एस श्रीसंत लवकरच क्रिकेटमध्ये वापसी करणार आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत तो केरळच्या संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने एकेकाळी फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. मात्र नेहमी वेगवेगळ्या वादात श्रीसंत अडकतच राहिला.स्पॉट फिक्सिंगबरोबरच आयपीएलमध्ये हरभजन आणि श्रीसंतमध्ये मोठा वाद झाला होता. २००८ सालच्या आयपीएलमध्ये हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानफटात मारली होती. तसंच राजस्थानसोबत असताना श्रीसंत आणि प्रशिक्षक पॅडी अप्टन यांचंही भांडण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र 2013च्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर सात वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. बीसीसीआयनं त्यानंतर श्रीसंतसह तीन खेळाडूंवर बंदीची घातली होती आणि याच प्रकरणाने त्याच्या जीवनाला कलाटणी दिली.

दरम्यान, 2015मध्ये श्री संतला विशेष न्यायायलानं त्याची निर्दोष म्हणून सुटका केली. 2018मध्ये केरळ न्यायालयानेही त्याच्यावरील आजीवन बंदी उठवली. आता सात वर्षांची बंदी पूर्ण झाल्यानंतर तो रणजी करंडक स्पर्धेत केरळ संघाकडून खेळणार आहे. मात्र असे असले तरीही त्यासाठी त्याला स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.

‘या’ १७ वर्षीय युवा खेळाडूचे वनडेत द्विशतक

“तुमचा लॉकडाउनचा एक्झिट प्लान काय ?” मनसेच्या एकमेव आमदाराचा ठाकरे सरकारला प्रश्न

भारत-चीन तणाव : चीनच्या उलट्या बोंबा, वाचा काय म्हटलंय चीनने ?