मुंबई : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंथ याच नाव सर्वांनाच माहिती आहे. तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. मात्र, आयपीएलमधील मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. यानंतर तो मैदानात परतला तोपर्यंत इतर अनेक खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघात स्थान पक्के केले होते. अशा स्थितीत तो पुन्हा कधीच क्रिकेटमध्ये खेळू शकला नाही. मैदानापासून दूर असूनही एस श्रीसंथ त्याच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे.
यावेळी त्याने संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. माजी वेगवान गोलंदाज म्हणतो की, जर तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला असता तर भारताने २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये विश्वचषक जिंकू शकले असते. या भारतीय वेगवान गोलंदाजाने टाइम्स नाऊशी केलेल्या खास संवादात सांगितले की, ‘जर मी विराटच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग असतो तर भारताने २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये विश्वचषक जिंकला असता.’
श्रीसंथ २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक संघाचा महत्त्वाचा भाग होता. जोपर्यंत तो संघात राहिला तोपर्यंत त्याचे गोलंदाजीचे नाणे मैदानातही कायम राहिले. त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे अनेक सामन्यांमध्ये देशाला विजय मिळवून दिला. असे असूनही त्यांची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. २०११ च्या विश्वचषकाबद्दल भारतीय स्टार वेगवान गोलंदाजाचे म्हणणे आहे, ‘आम्ही सचिन तेंडुलकरसाठी तो विश्वचषक जिंकला.’
भारतीय संघासाठी त्याने देशासाठी २७ कसोटी क्रिकेट सामन्यांच्या ५० डावांमध्ये ३७.६ च्या सरासरीने ८७ बळी मिळवले आहे. कसोटी क्रिकेटशिवाय त्याने देशासाठी ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३.४ च्या सरासरीने ७५ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१.१ च्या सरासरीने ७ बळी मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- खासदार कोणत्या मजबुरीतून सोडून गेले हे आम्हाला माहिती आहे, यामध्ये राजकारण अजिबात नाही : संजय राऊत
- Eknath shinde vs shiv sena : पक्ष सोडला नाही तर पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होणार?; हरीश साळवेंचा सवाल
- Ravi Rana : “आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला”, संजय पांडेंच्या अटकेनंतर रवी राणांचे वक्तव्य
- Ben Stokes : बेन स्टोक्सने दिली विराट कोहलीबद्दल भावनिक प्रतिक्रिया; म्हणाला,“त्याच्यासारखे खेळाडू…”
- “रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”,‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<