थलैवा राजकारणात ; रजनीकांत स्थापन करणार स्वतःचा पक्ष

रजनीकांत

टीम महाराष्ट्र देशा: देशाचाच नव्हे तर जागतिक पातळीवरील सुपरस्टार रजनीकांत हे राजकारणात उतरत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे.

चेन्नईच्या श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात त्यांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, माझा राजकारणातील प्रवेश ही काळाची गरज होती. सध्या राज्यातील लोकशाहीची अवस्था अत्यंत वाईट आहे. देशातील इतर राज्यांतील लोक ही परिस्थिती पाहून तामिळनाडूची थट्टा करतात. त्यामुळे मी इतके दिवस राजकारणात का आलो नाही, याची खंत आता मला वाटत आहे. सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली आपले पैसे आणि जमीन बळकावत आहेत. आपल्याला तामिळनाडूतील ही सगळी व्यवस्था बदलायची आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा, काम आणि विकास या तीन गोष्टी आपल्या पक्षाचा मंत्र असेल असे रजनीकांत यांनी स्पष्ट केल.

1 Comment

Click here to post a comment
Loading...