भाजप राष्ट्रवादीला मराठवाड्यात देणार आणखी एक धक्का?

औरंगाबाद:- विधानसभेचा तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी गळती लागली आहे. अनेक जन भाजप आणी शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत.साताराचे खासादार उदयनराजे, यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर ही भाजपच्या वाटेवर असतानाच औरंगाबादेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. प्रवेशासंबंधी कोकाटे यांच्या निवस्थानी राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह एका शिष्टमंडळाची बैठकही झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोकाटे  यांचा प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये यांनी दिली आहे . बुधवारी २१  ऑगस्टला राज्यमंत्री भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये,गटनेते प्रमोद राठोड,नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्यासह एक शिष्टमंडळाने काशिनाथ कोकाटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकाटे यांच्यासह त्यांचे मित्र कॉग्रेसचे नारायण अण्णा सुरगोणीवार यांची उपस्थिती होती.

पक्ष प्रवेशाबाबत काशिनाथ कोकाटे यांना विचारले असता ते म्हणाले, सिडकोच्या लिज होल्ड टू फ्रि होल्ड विषयी आम्ही प्रश्‍न उपस्थितीत केले होते. त्यामूळे सिडको प्रश्‍ना विषयी चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री सावे आमच्या घरी आले होते. यात भाजपच्या प्रवेशावर कुठलीही चर्चा झाली नाही. प्रवेशाबाबत विचार केलेला नाही असेही कोकाटे यांनी सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

दरम्यान शिवसेना हि फोडाफोडीच्या राजकारणात मागे नसून शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल यांना शिवसेनेमध्ये आज प्रवेश दिला. त्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.