…म्हणून माझ्या डोक्यावरचे केस गेले, उद्धव ठाकरेंचे भन्नाट उत्तर

Uddhav-Thackeray-Sanjay-Raut

मुंबई : शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भातही मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत.

मुलाखतीच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना काही गमतीदार प्रश्न विचारले. तुमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही, फक्त थोडे डोक्यावरचे केस तेवढे गेलेले दिसताहेत, हा सहा महिन्यांतला परिणाम आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझा चेहरा स्वच्छच आहे, फेसबुकलाईव्हमध्ये सुद्धा माझा फेस हा स्वच्छच होता. फेसबुकच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधला, त्याला काहीही म्हटलं तरी मी जनतेशी असलेले माझं नातं तुटू दिलं नाही, जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. त्यांच्यासोबत मी म्हणजे महाराष्ट्र सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात, प्रत्येक पावलांवर त्यांच्यासोबत आहे. केस कमी झालेले दिसताहेत, त्याचं कारणही सांगतो, एकतर बऱ्याच दिवसानंतर कालच मी केस कापलेत, गेले तीन-चार महिने स्वत:च स्वत:चे केस थोडेफार कमी करत होतो असं भन्नाट उत्तर त्यांनी दिलं.

‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन दोन दिवस आधीच संपला!

तसेच कोरोना संकटकाळात तुम्ही बोलत असता तेव्हा ते ऐकताना असं वाटायचं की, जागतिक आरोग्य संघटनेलासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मार्गदर्शन करताहेत की, इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून दिसतं, हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे कुठून आलं? असा प्रश्न संजय राऊतांनी केला. त्यावर याला असं काही नेमकं उत्तर देता येणार नाही, लहानपणापासून वैद्यकीय शास्त्र हा अगदी कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. अगदी माझ्या मनात डॉक्टर व्हावं असा विचार डोकावत होता पण नाही झालो ते बरचं झालं. डॉक्टर व्हावं म्हणून तसा प्रयत्न मी कधी केला नाही, पण मधल्या काळात होमिओपॅथीचा अभ्यास जरुर केला असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या कामाचा धडाका, एमएमआर क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा आढावा