५ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या ‘या’ माजी कॅबिनेट मंत्र्याचे निधन

Congress

टीम महाराष्ट्र देशा- माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांचं आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास हैदराबाद इथं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काँग्रेस आणि जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पक्षीय राजकारण केलं.

जयपाल रेड्डी यांचा जन्म १६  जानेवारी १९४२  मध्ये हैदराबादमधील मदगुलमध्ये झाला होता. सध्या हे तेलंगना राज्यात येते. जयपाल रेड्डी यांच्यामागे एक मुलगी आणि दोन मुले आहेत. यूपीए सरकारच्या काळात जयपाल रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. आंध्रप्रदेशात जयपाल रेड्डी चारवेळा आमदार आणि ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.