गोड बातमी : हार्दिक-नताशा होणार आई-बाबा

hardik-natasa-pregnant-

मुंबई : नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारा क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा हे आई-बाबा होणार असल्याची बातमी रविवारी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. त्याने चार फोटो पोस्ट करून गोड बातमी सांगितली.

या फोटोंमध्ये एक लग्नाचा फोटोदेखील असल्याने या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा आहे.हार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला होता. रविवारी हार्दिकनं नताशासोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली.

लॉकडाऊन मध्ये ‘हे’ कृत्य केल्याने आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या

हार्दिकनं 2020च्या पहिल्याच दिवशी नताशासोबत दुबईत साखरपुडा केला. सप्टेंबर 2019 पासून हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानंतर दुखापतीतून सावरल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज आहे.

सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने ‘सत्याग्रह’सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड एल. गोनीसोबत सहभाग घेतला होता.

‘थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी लावुन उर्वरित शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याबाबत बँकांना आदेश द्या’