Share

Rutuja Latke | अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा अर्ज स्वीकारला, उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेकडून मंजूर –

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला असून ऋतुजा लटके यांनी राजीनामा मंजूर झाल्याचं पत्र स्वीकारलं आहे. यानंतर आता ऋतुजा लटके महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसोबत निवडणुक उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अर्ज भरण्यापुर्वी ऋतुजा लटके यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या थोड्या भावूक झाल्या असून त्यांनी त्यांचे दिवंगत पती रमेश लटके यांची आठवण काढली आहे.

लटके काय म्हणाल्या –

12 वाजेपर्यंत आज उमेदवारी अर्ज भरायचा आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण गणपतीच्या पुजेनं करतो. ज्याप्रमाणे रमेश लटके हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मालपाडोंगरी येथे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचे, त्याचप्रमाणे मी देखील तिथे जाणार आहे, असं म्हणत आजच्या दिवसाची सुरुवातही मी त्याप्रमाणे बाप्पाचं दर्शन घेऊन केली आहे.

हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या आहेत. उद्या फॉर्म भरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. नवं चिन्ह आहे ,माणसं जुनी आहेत अशा शब्दात ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच त्यांच्यासोबत रमेश लटके यांचा आशीर्वाद असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्या भावुक झाल्या.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now