मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शुक्रवार १४ ऑक्टोबर शेवटचा दिवस असून लटके आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या महापालिकेमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या राजीनामावरुन चांगलाच वाद पेटला होता. अशातच त्यांना दिलासा मिळाला असून आज त्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या आहेत. उद्या फॉर्म भरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. नवं चिन्ह आहे ,माणसं जुनी आहेत अशा शब्दात ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच त्यांच्यासोबत रमेश लटके यांचा आशीर्वाद असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्या भावुक झाल्या.
ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजप मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असल्याची आतापर्यंत चर्चा होती. मात्र भाजपच्या वतीने अधिकृतपणे असं काहीही सांगण्यात आलेलं नाही. मुरजी पटेल यांनाच शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणूकीला उभे केले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. शिवसेनेतर्फे रमेश लटके येथे उभे होते. त्यावेळी मुरजी पटेल यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी पटेल यांचा पराभव झाला होता. आता पटेल यांनाच रमेश लटकेंच्या पत्नीविरोधात उभे करण्याचा प्लॅन भाजपचा होता. आता शिंदेसाठी भाजप हा उमेदवार सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal । बाळासाहेब ठाकरे काँग्रेससोबत गेले नाही असे नाही, त्यांनी मुस्लिम लीग सोबत…; भुजबळांचं जाहीर सभेत वक्तव्य
- Uddhav Thackeray । मी तर फक्त लढाईचीच वाट बघतोय; भुजबळांच्या व्यासपीठावरुन उद्धव ठाकरेचं खुलं आव्हान
- Uddhav Thackeray । शरद पवार आमच्यासोबत आहेत, जे वादळ निर्माण करतात – उद्धव ठाकरे
- Farooq Abdullah | फारुख अब्दुल्ला उद्धव ठाकरे यांना म्हणाले, अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ!
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील तीळ काढून टाकायचे असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय