Share

Andheri By Elections | मशालवर निवडणूक लढणाऱ्या ऋतुजा लटकेंची माघार? पर्यायी नावंही ठरलं

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकांसाठी मशाल चिन्हा कडून उमेदवार म्हणून लढणाऱ्या ऋतुजा लटके यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर त्यांच्या ऐवजी प्रमोद सावंत यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले आहे. लटकेंच्या राजीनाम्यावरुन वाद पेटत आहेत. मात्र, या बाबतची अजून अधिकृत घोषणा करायची बाकी आहे.

रात्री साडेअकरा वाजता ऋतुजा लटके यांना कुटुंबासह. या बैठकीला अनिल परब, प्रमोद सावंत कमलेश राय आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे वेगवेळ्या चर्चांना उधाण आलं आहे. यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडचण सापडलेल्या ऋतुजा रमेश लटके यांनी बुधवारी अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय या तिघांपैकी एकाला अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता होते. लटकेंचा राजीनाम्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, निर्णय जर ठाकरेंच्या विरोधात लागला तर या नावांपैकी एकाला उमेदवारी मिळणार होते. अशातच प्रमोद सावंतांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

प्रमोद सावंत हे अनिल परब आणि मातोश्रीच्या विश्वासातील असून त्यांनी शिवसेनेच्या अंधेरी पूर्व येथे संघटक म्हणून चोख पद्धतीने काम केलं आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर पदाचा चांगला अनुभव आहे. तर कमलेश राय हे उत्तर भारतीय असल्याने अंधेरी भागातील उत्तर भारतीय मतांचा ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकांसाठी मशाल चिन्हा कडून उमेदवार म्हणून लढणाऱ्या ऋतुजा लटके यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics