नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) आजपासून भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भारत आणि रशिया यांच्या दरम्यान डिफेन्स डिलवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. दरम्यान यावेळी भारत-चीन यांचे सध्याचे ताणलेले संबंध, भारत-पाक संबंध, अफगाणिस्तानमधली स्थिती आणि यात भारत-रशिया(India-Russia)ची भूमिका यासंबंधी चर्चा होणे अपेक्षीत आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आणि पुतीन यांची शिष्टमंडळ स्तरीय चर्चा आज होणार आहे. दरम्यान २०१९ मध्ये ब्रासिलियामध्ये मोदी आणि पुतीन यांची भेट झाली होती. त्यानंतर आता दोघांच्या भेटीची आणि चर्चेची ही पहिलीच वेळ आहे. भारत-रशिया यांच्यामधील हे २१ वे शिखर संमेलन आहे.
दरम्यान या चर्चेत भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर,संरक्षण मंत्री राजनाथसिंग भाग घेतील तर रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव प्रतिनिधीत्व करतील. दरम्यान रशियानं एके-203 असॉल्ट रायफलची (AK-203 assault rifles ) निर्मिती केलेली आहे. पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात याच रायफल्सची डील होणार आहे. विशेष म्हणजे ह्या रायफल्सची निर्मिती उत्तर प्रदेशातल्या अमेठीत मेक इन इंडियाच्या मिशन अंतर्गत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कारण नसतांना विरोध करणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट; भुजबळांचा फडणवीसांना टोला
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- ‘भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या लेखण्या म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या शेपटा’
- कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा राऊतांकडून निषेध
- …पण ती संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; दरेकारांचं शाईफेकला समर्थन