रशियाचे विमान ‘एंतोनोव एन-१४८’ कोसळले; ७१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा: रशियाची डोमेस्टीक विमान कंपनी असणाऱ्या सारातोव एअरलाईन्स कंपनीचे एंतोनोव एन-१४८ या विमानाने दोमोदेदोवो विमानतळावरुन उड्डाण केले होते. हे विमान रशियाची राजधानी मॉस्कोजवळ रविवारी एक स्थानिक प्रवासी विमान कोसळले असल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये रशियाच्या ७१ नागरीकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते ओर्स्क येथे निघाले होते. या विमानात ६५ स्थानिक प्रवासी आणि ६ विमान कर्मचारी उपस्थित होते. विमानाचा एक भाग पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाच्या आणीबाणी मंत्रालयाने दुर्घटनास्थळी एक पथक रवाना केले आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अरुगुनोवो गावातील प्रत्यक्षदर्शींनी पेटते विमान आकाशातून कोसळताना पाहिल्याचा दावा केला आहे.