10 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस बाजारात आणणार, रशियाचा मोठा दावा

corona vaccine

मॉस्को : दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत, वडगाव बुद्रुक पासून वॉशिंगटन पर्यंत सगळे जण एकच प्रश्न विचारात आहेत की कोरोनावर लस कधी येणार. आता याच कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

तर दुसरीकडे ‘ऑगस्ट मध्यपर्यंत कोरोनाव्हायरसच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो,’ असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. म्हणजेच पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया कोरोनाव्हायरसची लस बाजारात आणू शकतं. रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी सीएनएन चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लसीच्या मंजुरीसाठी 10 ऑगस्ट किंवा त्याआधीच्या तारखेवर काम करत आहोत.

मॉस्कोमधील गामालेया इन्स्टिट्यूटमध्ये ही लस बनवण्यात आली आहे. गामालेया इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांचा दावा आहे की, ‘सामान्य लोकांच्या वापरासाठी या लसीला 10 ऑगस्टपर्यंत मंजुरी देऊ शकतो. परंतु सर्वात आधी ही लस फ्रण्टलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल.’

रशियाच्या सोवरन वेल्थ फंडचे प्रमुख किरिल मित्रिव म्हणाले की, ‘ही ऐतिहासिक घटना आहे. ज्याप्रकारे आम्ही अंतराळात पहिला उपग्रह स्फूटनिक सोडला होता, ही तशीच घटना आहे. स्फूटनिकबाबत ऐकून अमेरिकेचे लोक आश्चर्यचकित झाले होते, त्याप्रकारे ही लस लॉन्च झाल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे’;

मात्र रशियाने आतापर्यंत लसीच्या चाचणीचा कोणताही माहिती जारी केलेली नाही. यामुळे या लसीच्या प्रभावाबाबत टिप्पणी करता येणार नाही. याशिवाय लस लवकरात लवकर बाजारात येण्यासाठी राजकीय दबाव असल्याची टीकाही होत आहे. यासोबतच या लसीच्या अपूर्ण मानवी चाचणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

सिन्नरमध्ये ‘पारनेर पॅटर्न’, राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेनेचे नगरसेवक फोडले

जगभरात डझनभर लसींची चाचणी सुरु आहे. काही देशांमध्ये लसींची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. तर रशियाच्या लसीचा दुसरा टप्पा अजून शिल्लक आहे. 3 ऑगस्टपर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचा मानस लसीच्या संशोधकांचा आहे.यानंतर तिसऱ्या टप्प्याचं परीक्षण सुरु केलं जाईल.

‘मानवी चाचणी रशियन सैनिकांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला’ असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. तर या योजनेचे डायरेक्टर अलेक्झांडर गिन्सबर्ग यांनी स्वत:वर लसीची चाचणी केली असल्याचा दावा आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ‘जागतिक महामारी आणि रशियातील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे औषधाला मंजुरी देण्याच्या दिशेने वेगाने काम केलं जात आहे.’ रशियात आतापर्यंत 82 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काँग्रेस नेत्यांचा आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा उद्देश आहे – मायावती