fbpx

नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

टीम महाराष्ट्र देशा : सध्या नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यातच मोदींसाठी चांगली बातमी आहे. रशियाने पंतप्रधान मोदींना ‘सेंट एंड्रयू अवॉर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना आता जगातील आणखी एका पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे

रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. रशियन दुतावासाने याबाबतची अधिकृत माहिती जारी केली आहे. १२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आल्याचं रशियाने म्हटलंय. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील.

यापूर्वी दक्षिण कोरियाने सियोल शांती पुरस्काराने मोदींना सन्मानित केलं होतं. तसचं युएई कडूनही त्यांना जायद पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.