फिफा विश्वचषक 2018 : रशियाचा स्पेनवर धक्कादायक विजय

कझान : फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली असून, साखळी सामन्यांप्रमाणेच बाद फेरीतही धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या रशिया विरुद्ध स्पेन सामन्यात अशीच थरारकता प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाली या सामन्यात सुरवातीपासूनचं स्पेनचं पारड जड मानण्यात येत होत मात्र रशियाने सुरवातीपासूनचं आक्रमक खेळ करत स्पेनवर विजय मिळवला.

यजमान रशियानं माजी विजेत्या स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रशियानं स्पेनवर ४-३नं मात केली. दोन्ही संघांनी निर्णायक वेळेत १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही संघांना अतिरिक्त वेळही देण्यात आला, पण यजमान रशिया आणि स्पेनला गोल झळकवण्यात अपयश आलं. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियानं बाजी मारली. १९७० नंतर रशियानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाच्या गोलरक्षकानं स्पेनचा मारा रोखला.

भारत दुस-या क्रमांकावर

स्पेनला मात देत भारताची ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक