ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे; आठवड्याभरात तीन तालुक्यात शुन्य रुग्ण संख्या

corona

औरंंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असून आठवड्याभरात जिल्ह्यातील ९ तालुक्या पैकी ३ तालुक्यात शुन्य रुग्ण संख्या आढळली आहे. तर बाधित रुग्णांच्या संख्येतही घट होत असल्याने ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. ग्रामीण भागात ऐके काळी रौद्ररुप धारण केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.

प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायाला दिलेला प्रतिसाद यामुळे ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी होत आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी पाच तालुक्यात शुन्य रुग्ण संख्या आढळली तर मंगळवार, बुधवार चार तालुके व गुरूवार, शुक्रवार, शनिवारी तीन तालुक्यात शुन्य रुग्ण संख्या आढळली आहे. त्यापाठोपाठ नव्याने बाधित होणार यांची संख्याही पन्नासच्या आत सापडत आहे.

दरम्यान खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतीची कामे सुरळीत चालु असल्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा दायक परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला ग्रामीण भागात गावाची गाव बाधित आढळत होते. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश गाव ही कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP