मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवारांनी स्वतः ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आणि चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे. कोरोनाचे सौम्य लक्षणे असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. शरद पवार कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी ट्विट करत प्रार्थना केली आहे.
#संघर्षयोद्धा : साहेब लवकर बरे व्हा…👍
पाच दशके पराजयाच्या छाताडावर नाचत ;
बहुजनांच्या संघर्षचा "अपराजित योद्धा"
म्हणजे साहेब ! आपण या संकटाला हरवून आमच्या मार्गदर्शनासाठी व महाराष्ट्रहितासाठी लवकर सक्रिय व्हाल हि सदिच्छा ..@SakalMediaNews @MHD_Press pic.twitter.com/be9Jfcglly— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 24, 2022
रुपाली पाटील ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, ‘संघर्षयोद्धा : साहेब लवकर बरे व्हा… पाच दशके पराजयाच्या छाताडावर नाचत; बहुजनांच्या संघर्षचा “अपराजित योद्धा” म्हणजे साहेब ! आपण या संकटाला हरवून आमच्या मार्गदर्शनासाठी व महाराष्ट्रहितासाठी लवकर सक्रिय व्हाल हि सदिच्छा..’, असे ट्विट रुपाली पाटील यांनी केले आहे.
शरद पवार यांनी कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती ट्विट करत दिली होती. शरद पवार ट्विटमध्ये म्हणाले होते, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की, त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे ट्वीट शरद पवारांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
-
‘ऊर्जामंत्र्यांचे ते विधान बरोबर नाही’; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
-
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर भाजप आक्रमक; पुनम महाजन म्हणाल्या,“नामर्दांसारखे कार्टून…”
-
“संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”
-
‘…म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल