Share

Rupali Thombre | चंद्रशेखर बावनकुळे यांना हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज – रुपाली ठोंबरे

Rupali Thombre | पुणे : काल (बुधवार) खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महत्त्वाच्या नेत्यांनी आज भाजपत (BJP) प्रवेश केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत होते. यावेळी त्यांनी बारामतीत घड्याळ बंद पडणार असल्याचा दावा केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी चंद्रशेखर यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने कुणीतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जावे. कारण त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने झटके येत असतात, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना लवकर मदत पोहचली पाहिजे. अन्नधान्याची दिवाळीच्या मुहूर्ताची कीट त्यांना मिळाली पाहिजे. असे प्रश्न न सोडविता सातत्यानं त्यांना जे झटके येतात. त्यासाठी त्यांच्यावर लवकर उपचार होणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कधीही 50-55 पेक्षा आमदार निवडून आले नाही. त्यांनी आजपर्यंत तोड, फोडीचे राजकारण केलं. आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिलं. मात्र, ते कधीही पंतप्रधान बनू शकत नाहीत, भविष्यात होतील की माहिती नाही, असं म्हणत चंद्रेशखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे.

तसेच, आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजप राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आखत असल्याचा दावा केला होता. मात्र फोडा-तोडा ही वृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असा प्रत्यारोप बावनकुळे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

Rupali Thombre | पुणे : काल (बुधवार) खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महत्त्वाच्या नेत्यांनी आज भाजपत (BJP) प्रवेश केला. याप्रसंगी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now