Share

Rupali Thombre | पुण्यातील पावसावरून रुपाली ठोंबरे यांचे अमृता फडणवीसांवर टीकास्र, म्हणाल्या…

Rupali Thombre | पुणे : सोमवारी पुणे (Pune Rain) शहरामध्येही खूप जोरात पाऊस झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काहीवेळातच पावसाने चांगलाच जोर धरला. पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे. रसत्यांवरील पाण्यामुळे एसट्या देखील ठप्प झाल्या. ज्यामुळे अनेक प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre)

महाविकास आघाडी सरकार असताना जागरुक नागरिक असलेल्या अमृता फडणवीस यांनी पुन्हा जागं व्हावं, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमृता फडणवीस जागरुक नागरिक होत्या. त्यावेळी त्यांनी पाणी साचलेल्या भागात फोटोसेशन करून मुंबईला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न विचारत एक ट्वीट केलं होतं. मात्र, आता पुण्यात पाणी साचल्यानंतर कर्तव्यदक्ष मिसेस उपमुख्यमंत्री कुठे आहेत?, असा सवाल रूपाली ठोंबरे यांनी केला आहे.
तसेच, आज त्यांचे पती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. ज्यापद्धतीने तुम्ही महाविकास आघाडी सरकारला सातत्याने सल्ले देत होतात. ते सल्ले तुम्ही आता उपमुख्यमंत्री असलेल्या आपल्या पतीला देणार आहात का?, असा खोचक सवालही रूपाली ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना केला आहे.

पुढे बोलतना त्या असंही म्हणाले की, विरोधात असताना सत्ताधाऱ्यांवर आरोप करणं सोप्प असतं. मात्र, स्वत: सत्तेत असताना आपल्या लोकांचे कान धरणं तेवढं अवघड असतं आणि ते अमृता ताईंनी करावं, कारण त्या परखड बोलणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी आता जागं होण्याची गरज आहे
महत्वाच्या बातम्या :

Rupali Thombre | पुणे : सोमवारी पुणे (Pune Rain) शहरामध्येही खूप जोरात पाऊस झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास पावसाला सुरूवात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now