Share

Rupali Thombare । “राणेंनी स्वत:सहीत पोरांना आवरतं घ्यावं”; नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या

(Rupali Thombare)  मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या वडिलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना चांगलंच सुनावलं आहे. “भाजपा २०१४ साली सब का साथ सब का विकास या घोषणसहीत सत्तेवर आलं होतं. मात्र कुटनिती आणि फक्त आरोप करणे हेच सुरु आहे. नारायण राणेंसारखे ढीगभर नेते आहेत जे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि इतर पक्षांमधून ईडी तसेच इतर यत्रणांचा दबाव टाकून स्वत:कडे घेतलं आहे,” असा टोला ठोंबरेंनी भाजपाला लगावला.

भास्कर जाधव हे शिक्षकाचे पुत्र आहेत का? हा संशाधनाचा विषय असल्याचं नितेश राणे म्हणाले होते. रुपाली ठोंबरे यांनी यावर भाष्य केलं आहे. “मुळात भास्कर जाधव यांचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल असं बोलणं यामधून त्यांचे संस्कार दिसतात. राणेंनासुद्धा जशाच्या तसे उत्तर देणारे आपल्या राजकारणात आहेत. त्यांनीही सूक्ष्म, लघू, शिशू. दुसऱ्यावर टीका करताना जबाबदारीने करावी. ती वैयक्तिक असता कामा नये. विकासावर, चुकलेल्या गोष्टींवर किंवा खरा भ्रष्टाचार झाला असेल तर त्यावर बोलावं. मात्र भाजपाकडे सुसंस्कृतपणा होता तो अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत संपलेला आहे,” असंही रुपाली ठोंबरे यावेळी बोलताना म्हणाल्या.

भाजपा २०१४ साली सब का साथ सब का विकास या घोषणसहीत सत्तेवर आलं होतं, मात्र आता फक्त कुटनिती, एकमेकांना वाईट बोलणं, एकमेकांच्या बेडरुममध्ये काय चाललंय याबद्दल बोलणं हेच भाजपकडून चालू असल्याची टीका ठोंबरेंनी यावेळी केली. राणेंनी तर स्वत:सहीत पोरांना आवरतं घ्यावं कारण तो काळ गेला. भास्कर जाधव म्हणाले की तुम्हाला बाळासाहेबांचा शाप लागला आहे. खरोखरच इथले कर्म इथेच फेडावे लागतात. हिंदू धर्मानुसार जे धार्मिक आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे जे पाप इथे करणार ते इथेच फेडावं लागणार. याची दक्षात त्यांनी घ्यावी आम्ही नाही,” असं म्हणत ठोंबरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते नितेश राणे?

“भास्कर जाधव म्हणतात मी शिक्षकाचा मुलगा आहे. मात्र मला तसे वाटत नाही. शिक्षकाचा मुलगा एवढा वात्रट निघेल, असे मला वाटत नाही. शिक्षक असलेल्या वडिलांनी त्यांच्यावर काय संस्कार केले असतील? भास्कर जाधव हे खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे,” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर केली. भास्कर जाधव आमच्यावर भुंकण्याचं काम करुन गेलेत. गेले अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय की उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणवतात. मात्र बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याची हिम्मत उध्दव ठाकरेंमध्ये नाही. त्यांना अशी भटकी कुत्री सोडावी लागतात. जे येऊन राणेंवर येऊन प्रहार करणार. भाजपावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीका करणार आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून मजा करणार, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या :

(Rupali Thombare)  मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या वडिलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now