‘एकतर्फी प्रेमातून निघृण खून करणाऱ्या नराधमाचे वकील पत्र कोणीही घेऊ नये’

'एकतर्फी प्रेमातून निघृण खून करणाऱ्या नराधमाचे वकील पत्र कोणीही घेऊ नये'

पुणे – पुण्यात १४ वर्षीय  कब्बडीपटू मुलीवर एकतर्फी प्रेमातुन कोयत्याने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिबळेवाडी परिसरात हि घटना घडली. कब्बडीच्या  सरावासाठी बाहेर आली असताना तीन नराधम मुलांनी तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यातच तिचा मृत्यू झाला.

पिडीतेवर हल्ला केल्यानंतर ते तिघेही आरोपी तिथून फरार झाले. हत्येच्या वेळेस त्या आरोपीकडे पिस्तुल सुद्धा होते असे पोलीसाकडून सांगण्यात आले आहे.या घटनेनंतर समाज माध्यमामधून त्यांचा तीव्र निषेध केला जात आहे.अनेक राजकीय नेत्यांनी या मुलीबद्दल दुख: व्यक्त केला आहे. आता या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुद्धा या प्रकरणाबाबत समाज माध्यमावर एक ट्वीट केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, पुण्यातील १४ वर्षीय कब्बडी खेळाडू मुलीचा एकतर्फी प्रेमात निघृण खून करणाऱ्या नराधमाचे वकील पत्र कोणीही घेऊ नये ही विनंती.आरोपींना फास्ट ट्रॅक केस चालवून लवकर शिक्षा व्हावी हीच त्या लेकराला श्रद्धांजली असेल. शेवटी महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीत असे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या