Share

Rupali Patil | “प्रसाद लाड यांची जीभ…”; शिवरायांवरील विधानावरून रुपाली पाटील आक्रमक 

Rupali Patil | मुंबई : नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. अशातच आज भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याचा इशारा त्यांनी दिला.

पुढे त्या म्हणाल्या, “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा देखील निषेध केला आहे. आंदोलन केली आहेत. तरीदेखील प्रसाद लाड यांनी आज हे वक्तव्य करण्याची हिम्मत केली आहे. यांना शिक्षा एकच आहे ती म्हणजे यांची जीभ छाटली पाहिजे.”

काय म्हणालेत प्रसाद लाड?

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

Rupali Patil | मुंबई : नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. अशातच आज भाजपचे नेते प्रसाद …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now