पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच महाराष्ट्र व मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेसह आता भाजपनेही त्यांच्या या विधानावरून टीका केली आहे. भाजपनेही त्यांच्या विधानाला असहमती दर्शवली आहे. यातच आत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनीही राज्यपालांचा समाचार घेतला आहे. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यामागे भाजपचाच हात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीने आंदोलन केले. त्याचवेळी बोलताना रूपाली पाटील म्हणाल्या, “भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून निघावं. हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित पदावरून पायउतार व्हावं. आता त्यांची माफी वगैरे नाही पाहिजे, त्यांनी राज्यपाल पदावरून पायउतार होणंच आता गरजेचं आहे. भगतसिंह कोश्यारी चले जाओ.” यादरम्यान राज्यपालांवर टीका करताना रूपाली पाटील यांची जीभ घसरल्याचे दिसून आले. राज्यपालांनी पायउतार व्हावं, असं म्हणताना त्यांनी राज्यपालांचा उल्लेख ‘म्हाताऱ्या’ असा केला.
फडणवीसांनीही हात झटकले
कोश्यारी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं योगदान खूप मोठं आहे. राज्यपालांनाही याची जाणीव असावी. मात्र एखाद्या विशेष कार्यक्रमात आपण अतिशयोक्ती अलंकार वापरतो, त्या स्थितीतून राज्यपालांचं वक्तव्य आलं असावं. याबद्दल ते स्वतः स्पष्टीकरण देतील.”
राज्यपालांचे स्पष्टीकरण
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर आज दिवसभर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेद करत मोठ्या प्रमाणावर टीका केली. त्यांनतर राज्यपालांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे. “मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता”, असे राज्यपाल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath shinde | “मी मुलाखत दिली तर राज्यात भूकंप होईल”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- Bhagat Singh Koshyari । मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता; वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण
- Eknath Shinde । “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, त्यामुळे त्यांनी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला
- Udhdav Thackeray : “…हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन”, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!
- Devendra Fadnavis । राज्यपालांच्या विधानाशी भाजप सहमत नाही – देवेंद्र फडणवीस
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<