मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच…

blank

अहमदनगर : गर्भलिंग निदान वक्तव्यामुले वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई प्रचंड झाल्या आहेत. येत्या चार दिवसात इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर अकोला येथे जाऊन त्यांना महिला कार्यकर्त्या त्यांना काळे फासतील असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना इंदोरीकर महाराजांबाबत जाब विचारला जाईल. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या संदर्भात भूमाता ब्रिगेडकडून मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

तर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता तृप्ती देसाई यांनाच आव्हान दिले आहे. ”आता हे खूप अति होतंय, तू येच ग श्रुपनखा ,कोणच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ तुझ्या उघड्या डोळ्यांनीच. तू काळ फासायला असलीस तर आम्हीच एक लाख रुपये देऊ तुला. असे खुले आव्हान पाटील यांनी दिले आहे. तसेच सदसदविवेकबुद्धीने धर्माचा प्रचार करत एखादा दाखला दिला तर त्यासाठी गुन्हा दाखल करण्याची काहीच गरज नसते. असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. या सर्व वादामुळे आता मात्र इंदुरीकर विरुध्द देसाई नव्हे तर रुपाली पाटील ठोंबरे विरुध्द तृप्ती देसाई असा सामना आता रंगणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, खुद्द इंदोरीकर महाराजांनी माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोलले आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.