मनसेची रणरागिणी रुपाली पाटील तिकीट न मिळल्याने आक्रमक

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेवरांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतून मनसेच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील यांचे तिकीट कसबा मतदारसंघातून कापण्यात आल आहे. यावरून रुपाली पाटील यांनी मुंबई येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कसबा मतदारसंघात रुपाली पाटील यांचे चांगले वर्चस्व आहे. मात्र मनसे ने रुपाली पाटील यांना डावलत अजय शिंदे यांना तिकीट देण्यात आल आहे.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक होत्या. तसेच पाटील यांनी मतदारसंघात तयारी देखील केली होती. भाजप उमेदवार मुक्ता टिळक यांच्या विरोधात उतरण्यासाठी रुपाली पाटील यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र ऐन वेळी रुपाली पाटील यांचे पक्षाकडून तिकीट कापण्यात आले आहे. २०१४ च्या विधानसभेला रुपाली पाटील यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या वेळेसही रुपाली पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.

दरम्यान मनसेने काल आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 27 उमेदवारांची नावं आहेत. वरळीत आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसेनं उमेदवार दिलेला नाही. दादर माहीम मधून नितीन सरदेसाई यांचा पत्ता कापत संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महपालिकेतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डेला यांना कलिना इथून उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या