फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं – रुपाली चाकणकर

blank

पुणे : राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले आहे.

भाजपच्या या आंदोलनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली आहे. ‘माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री,सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय. आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसरे, अशी ओळख निर्माण झाली. २०१६ ते २०१८ या काळात ३१,१२६ घटना घडल्या हे आपण विसरू नका. आजचे आंदोलन हे तुमच्या अपयशाचा आरसा आहे. चोराच्या उलट्या बोंबा. हे तंतोतंत आपण पालन करत आहात’. असा घणाघात चाकणकर यांनी केला आहे.

दरम्यान, या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकावर केली आहे.