‘राजकारणात जनता रिटेकची संधी देत नाही, अभिनय क्षेत्राकडे परत जावा’

rupali chakankar

मुंबई : खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अखेर उच्च न्यायालयामार्फत रद्द करण्यात आलं आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला.

वडिलांचं सर्टिफिकेट रद्द केल्यानंतर आजोबांच्या नावाने खासदार नवनीत राणा यांनी सर्टिफिकेट बनवलं होतं. परंतू, उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेतला आणि त्यांना कॉन्स्टिट्युशन फ्रॉड म्हणून 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी हे आरोप फेटाळून लावत शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं.

आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना खोचक सल्ला दिला आहे. ‘अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही,’ असा टोला चाकणकर यांनी लगावला.

पुढे त्या म्हणाल्या, ‘अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावती जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं.’

पहा व्हिडीओ –

महत्वाच्या बातम्या