पुणे ; रुपाली चाकणकरांचं पद काढलं, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी स्वाती पोकळेंची निवड

टीम महाराष्ट्र देशा :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहराच्या संघटनेमध्ये मोठे बदल केले आहेत. राष्ट्रवादी पुणे शहराच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पद काढत स्वाती पोकळे यांना शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Loading...

आगामी विधानसभा निवडणुक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुणे शहराच्या संघटनेमध्ये मोठे बदल केले. राष्ट्रवादीचे महिला ,युवक, विद्यार्थी, युवती, अल्पसंख्यांक, कामगार ,अशा समाजातील विविध घटकांमध्ये काम करण्यासाठी संघटना व सेल आहेत या संघटनाच्या अध्यक्षांच्या राष्ट्रवादीने आज नवीन नेमणुका केल्या आहेत.

याचदरम्यान राष्ट्रवादी पुणे शहराच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पद काढत स्वाती पोकळे यांना शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांना पक्षाने अद्याप दुसरी कोणतीही जबाबदारी सोपवली नाहीये. रुपाली चाकणकर यांना पदावरून काढल्याने पुणे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

रुपाली चाकणकर आणि पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यात मतभेद असल्याने चाकणकर यांचे पद काढले असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर रुपाली चाकणकर या खडकवासल्यातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांचे पद काढत त्यांना विधानसभेला संधी देण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. दरम्यान रुपाली चाकणकर यांना पक्ष कोणती जबाबदारी देईल याकडे चाकणकर समर्थकांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका केल्या आहेत.Loading…


Loading…

Loading...