Share

Rupali Chakankar | “कुंकू लाव मगच बोलतो” संभाजी भिडेंच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, चाकणकर म्हणाल्या…

Rupali Chakankar | पुणे : सध्या राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वतावरण खूपच गढूळ होत चाललं आहे. अशातच शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एक विधान केलं आहे. एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिला पत्रकाराला बोलण्यास नकार दिला. यावरून राजकीय वर्तुळात त्याविषयी चर्चा केल्या जात आहे. अशातच संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar)

संभाजी भिडे यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. रूपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना चाकणकर असंही म्हणाल्या की, ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे, असं भिडे यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

Rupali Chakankar | पुणे : सध्या राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वतावरण खूपच गढूळ होत चाललं आहे. अशातच …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now