चंद्रकांतदादा तुम्ही राहूद्या, ‘ये आपके बस का काम नही है’ – रूपाली चाकणकर

blank

पुणे : भाजपही देशावरील आपत्ती आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केली होती, यावर उत्तर प्र्युत्तर देताना ‘ मागील पन्नास वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. “शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते 50 वर्ष राजकारणात आहेत, तरीही त्यांचा पक्ष दहापेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय?’ असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटलांनी टोमणा मारला.

यावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मा. चंद्रकांत पाटील आपण आदरणीय शरद पवार साहेबांवर शिवाजी विद्यापीठातून पीएचडी करणार आहात. उत्तम मानस आहे तुमचा, पण आधी त्यासाठी Postgraduate व्हावं, झाले पास तर ठीक नंतर पीएचडी पात्रतेचा विचार करावा. ये आपके बस का काम नही है. अस म्हणत घणाघाती टीका केली आहे.

दरम्यान, याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेखी मिरवू नये, ‘आम आदमी पक्षा’ला मिळालेल्या यशात त्यांचं काहीही योगदान नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनेही मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली, त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. शरद पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचं काम करु नये, असं चंद्रकांत पाटलांनी सुनावलं होतं. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेले हे वाकयुद्ध कुठपर्यंत जातं हे पाहण महत्वाच असणार आहे.