राज्य महिला आयोगापदी रुपाली चाकणकर? आज घोषणा होण्याची शक्यता 

rupali chakankar

मुंबई: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नेतृत्व दिले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान याअगोदर विजया रहाटकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या.

या पदासाठी राष्ट्रवादीच्या माजी आमदार व प्रवक्त्या विद्या चव्हाण तसेच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांची नावे चर्चेत होती. मात्र आता रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती मिळते आहे.

आता यावरूनच भाजपने मात्र रुपाली चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना साधला आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल. असे ट्वीट करत त्यांनी रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या