राज्य चालवणं हे काय येड्या-गबाळ्याचं काम नाही – रावसाहेब दानवे

danave

पैठण : कोरोना व्हायरस साथीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी राज्याचे दौरे करून जनतेला दिलासा देणं महत्त्वाचं असतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मी आणि माझं कुटुंब’ म्हणत घरात बसून आहेत. राज्य चालवणं हे काय येड्या-गबाळ्याचं काम नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. पैठण शहरात आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी दानवे बोलत होते.

“राज्यात सरकार कोण चालवतं, निर्णय कोण घेतं, ते कळतच नाही. संकटकाळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते राज्यभर दौरे करत आहेत. पण राज्याचे प्रमुख ‘मी आणि माझं कुटुंब’ म्हणत घरात बसून आहेत, हे राज्याचं दुर्दैव आहे,”असं दानवे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का असा सवाल दानवे यांनी विचारला आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-