कर्नाटकमध्ये आघाडीचे सरकार चालवणे मोठे आव्हान – कुमारस्वामी

नवी दिल्ली – जेडीएसचे नेते कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप अध्यक्षा मायावती, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि अनेक प्रादेशिक नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान शपथविधीपूर्वी त्यांनी आद्य शंकराचार्य यांनी जेथे पहिला मठ स्थापन केला त्या श्रृंगेरीत जाऊन दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी म्हंटल की, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीचे सरकार चालवणे ही सोपी गोष्ट नसून ते माझ्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

‘‘मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडू शकेन, असे मला वाटत नाही. लोकांमध्येही साशंकता आहे. ती केवळ माझ्याबद्दलच नाही, तर हे सरकार कामकाज उत्तमपणे पार पाडेल की नाही, याबद्दलही आहे. पण जगद्गुरू शंकराचार्य आणि शारदाम्बा देवी यांच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील, असा मला विश्वास वाटतो.