गेल रिटर्न्स : वेस्ट इंडिज संघात ख्रिस गेलची वापसी

मुंबई – वेस्ट इंडिजच्या संघात जगातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलचे पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी घोषणा झाली आहे. ख्रिस गेलचा यात समावेश करण्यात आला आहे.

ख्रिस गेल तब्बल 18 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वेस्ट इंडिजच्या संघात परतणार आहे. गेलचे संघात पुनरागमन हे वेस्ट इंडिजसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण आगामी विश्वचषक स्पर्धेत गेल खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल जुलै 2017मध्ये आपला अखेरचा सामना वेस्ट इंडिजसाठी खेळला होता.

गेल सोबत विंडीजच्या संघात डाव्या हाताने फलंदाजी करणारा निकोलस पूरन याचीही निवड झाली. २० फेब्रुवारीला दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.