खुल्या प्रवर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी रन फॉर मेरीट

टीम महाराष्ट्र देशा : सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय रन फॉर मेरीटचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच वेळी राज्यातील प्रमुख तीस शहरांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ऑटो चौकातून रविवारी (ता. ९ ) सकाळी सात वाजता या रन फॉर मेरिटची सुरुवात होईल आणि डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ समारोप होईल.

रन फॉर मेरीटचे उपाध्यक्ष विश्वजीत देशपांडे म्हणाले, ‘यामध्ये तरुण-तरुणी विद्यार्थी महिला व्यापारी असे खुल्या प्रवर्गातील विविध घटक सहभागी होणार आहेत. मतांच्या राजकारणासाठी अत्याधिक आरक्षणाच्या धोरणाचा अवलंब केला जात आहे, पण यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक तरुणांना डावलले जात आहे. याविरोधात सेव्ह मेरिट सेव्ह नेशन सक्रिय असून रस्त्यावरच्या लढाईपासून न्यायालयीन लढाई पर्यंत सर्व प्रकारच्या संवैधानिक आयुधांचा वापर करत आहे. या लढाईचाच एक भाग म्हणून खुल्या प्रवर्गातील न्याय मिळवून देण्यासाठी रन फॉर मेरीट चे आयोजन करण्यात आले आहे.

Loading...

तसेच रन फॉर मेरीटसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट दिले जाणार असून अधिकाधिक विद्यार्थी महिला तरुण-तरुणी सर्व समाज घटकांनी रन फॉर मेरीट मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री विवेकानंद पाठक, डॉ सुश्रुत शहा, डॉ अर्चना चिंचवडकर, डॉ रेणुका धुर्वे, संजय गांधी, आनंद दवे, प्रशांत कौसडीकर, जयंत गौरकर, मदन सिन्नरकर, डॉ अर्चना अग्रवाल, महेंद्र लुनिया, धीरज ओस्तवाल, अमित कवी आदींनी केलेले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन