भागो भागवत आया! संघाच्या थंडीतील उबदार स्वप्नावर राज ठाकरेंचे फटकारे

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांचा बॅकलॉग भरून काढण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. केंद्रातील मोदी सरकार असो कि राज्यातील फडणवीस सरकार कोणीही राज ठाकरेंच्या कुंचल्यातून सुटत नाहीये. आज पुन्हा एकदा त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून आरएसएसचे अध्यक्ष मोहन भागवत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्कराला सहा ते सात महिने लागतात तिथे संघाचे स्वयंसेवक दोन ते तीन दिवसात प्रशिक्षित केले जाऊ शकतात. गरज पडल्यासा स्वयंसेवक सीमेवर जायलाही तयार आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मोहन भागवत यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात भागवत यांनी भारतीय सैन्य आणि संघाच्या स्वयंसेवक यांच्यातील केलेल्या तुलनेचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. यामध्ये मोहन भागवत हे झोपेत असताना गुलाबी थंडीत उबदार स्वप्न बघत असल्याच दाखवत खिल्ली उडवण्यात आली आहे. यावरून मोहन भागवत यांचे विधान हे केवळ स्वप्नातच शक्य असल्याच दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे.

 

You might also like
Comments
Loading...