मतदार जागृतीसाठी शनिवारी ‘रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी’

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, या हेतूने शनिवार, 12 ऑक्टोबर सायंकाळी सात वाजता ‘रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी’चे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी’ घेण्यात येत आहे. यासाठी निवडणूक यूथ आयकॉन आणि राष्ट्रीस सेवा योजनेच्या ब्रँड ऍ़मबेसेडर नवेली देशमुख उपस्थित राहणार आहेत.

‘रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी’ची सुरूवात क्रांती चौक येथून होणार आहे. यामध्ये पहिल्या ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणाऱ्या एक हजार 500 सहभागींना पदके वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी www.runforaurangabad.com या लिंकवरून नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या