डोनाल्ड ट्रम्प किम जोंग उन यांची ‘या’ ठिकाणी घेणार भेटणार

सिंगापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे  हुकुमशहा किम जोंग उन यांच्या 12 जूनरोजी होणाऱ्या भेटीचे ठिकाण व्हाईट हाऊसने आज जाहीर केले. सिंगापूरजवळील सेंटोसा बेटावर कॅपेला हॉटेलमध्ये हे दोन नेते भेटणार आहेत. व्हाईट हाऊसच्या माध्यमसचिव सारा हकाबी सँडर्स यांनी ट्वीटरवरून ही माहिती जाहीर केली.

” डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची सेंटोसा बेटावरील कॅपेला हॉटेलमध्ये भेट होणार आहे. सिंगापूरने या भेटीसाठी यजमानपद स्वीकारून केलेल्या आदरातिथ्याबद्दल आम्ही आभारी आहोत” असे ट्वीट सारा यांनी केले आहे.

किम आणि ट्रम्प हे 12 जून रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता या हॉटेलमध्ये भेटतील. ही बैठक केवळ एकच दिवस चालणार आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए- इन यांनी ट्रम्प यांना या बैठकीनंतर आपण तीन देशांनी मिळून एक चर्चापरिषद घेऊ अशी विनंती केली आहे. मात्र व्हाईट हाऊसने याबाबत अजून कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. बैठकीसाठी या हॉटेलची निवड होईल अशी चर्चा एक आठवडाभर सुरुत होती.

You might also like
Comments
Loading...