‘शिवजयंतीला नियम, पोहरादेवीला गर्दी; हेच का समसमान वाटप?’

sanjay rathod puja

औरंगाबाद : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड हे अखेर जनतेसमोर आलेत. दर्शनाच्या निमित्ताने राठोड हे पोहरादेवी गडावर दाखल झालेत. मात्र, यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. यावरून नेटिझन्संनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

”आम्हाला शिवजयंती करू दिली नाही. पण पोहरागडावरती संजय राठोडच्या समर्थकांची हजारोच्या संख्येत मोठी गर्दी झाली. हेच का समसमान वाटप. आता कारवाई कोणावर?” असा प्रश्न एका शिवप्रेमी महिलेने विचारला आहे.

तर मंदिर बंद करण्यात्या मुद्द्यावरून देखील ठाकरे सरकावर सोशल मीडियाद्वारे हल्लाबोल करण्यात आला आहे. ”कोरोनामुळे पंढरपूर अन् शेगावचे मंदिरही बंद आहे. पण पोहरादेवीच मंदिर मात्र उघडं आहे. कारण तिथे संजय राठोड पूजा करायला येणार आहेत. नियम बंधने फक्त सामान्य जनतेला?” असा सवाल एकाने विचारला आहे.

दरम्यान, हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक पोहरादेवी गडावर एकत्र आलेत. पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राठोड यांच्या या स्टंटबाजीमुळे कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची दाट शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने राठोड आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतेय.

महत्त्वाच्या बातम्या