fbpx

अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात दगडफेक; 51 जणांना अटक

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुवारी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दोन गटांनी घातलेल्या गोंधळाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी 51 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. चौंडीतील अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात गुरुवारी घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक, तसंच पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या दगडफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणात डॉक्टर इंद्रकुमार भिसे आणि सुरेश कांबळे यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पालक मंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम योजिला होता. या कार्यक्रमाला लोसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन देखील उपस्थित होत्या. धनगर आरक्षणावरून दोन गटात वाद झाल्याने या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.