खात्यात १५ लाख कधी जमा करणार; आरटीआय कार्यकर्त्याने मागितली PMO कडे माहिती

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. यावरून अनेकवेळा विरोधकांनी मोदी याच्यावर टीकेची झोड देखील उठवली होती. आता एका आरटीआय कार्यकर्त्याने जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये कधी जमा करणार याची विचारणा थेट PMO कडेच मागितली होती.

bagdure

पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला माहिती अधिकारा अंतर्गत अशी माहिती देता येणार नसल्याचे सांगितले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते असणारे मोहन कुमार शर्मा यांनी नोटबंदी झाल्यानंतर हि माहिती मागवली होती, मात्र त्यांना माहिती देण्यात आली नाही. पुढे शर्मा यांनी मुख्य माहिती अधिकार आयुक्त आर के माथूर यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर विचारलेली माहिती ही माहिती अधिकार कार्यकक्षेत येत नसल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर मोहन कुमार शर्मा यांना देण्यात आले.

You might also like
Comments
Loading...