दौंड: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते ‘आरटीआय’ कार्यकर्त्याच्या आत्महत्येस जबाबदार?

Suicide crime

पुणे : मदरसा आणि मशिदीसंबधीची माहिती माहिती अधिकारात मागविल्याने आणि संबंधितांकडे तक्रार केल्याने अकरा जणांनी त्रास दिल्यामुळे दौंड शहरातील आरटीआय कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकरा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निसार जब्बार शेख (वय 46, रा. कुंभार गल्ली, दौंड), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, मशिदीचे मौलाना यांच्यासह एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वी निसार शेख यांनी संशयित आरोपींचा नामोल्लेख करणारा स्वतः चा एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ काही मित्र, पोलीस अधिकारी आणि नातेवाईकांना पाठवला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दौंड शहरातील गोपाळवाडी रस्ता व लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत इमदादुल उलूम युसुफिया या एकाच नावाने दोन मदरसा सुरू असून त्याच जागेत मदरसा इमदादुल उलूम युसुफिया माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. अंजुमन-ए-इब्राहिम बिस्मिल्लाह ट्रस्ट व कुबरा मस्जिद (खाजा वस्ती) याच पत्त्यावर कागदोपत्री दाखविण्यात आल्या आहेत परंतु प्रत्यक्षात हे काही ट्रस्टींचे निवासस्थान असल्याने निसार जब्बार शेख यांनी माहिती अधिकारात या सर्व संस्थांची माहिती मागविली होती.

Loading...