fbpx

पवारांची पलटी : संघाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले होते. स्वयंसेवक ज्याप्रमाणे जनसंपर्क साधतात त्याप्रमाणे चिकाटी असायला हवी, असे ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले होते. मात्र आता पवारांनी आपल्याच वक्तव्यावर घुमजाव केले आहेत. आज सकाळी फेसबुक लाइव्ह करत पवार यांनी चक्क संघावर टीका केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशासाठी घातक असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी आपण संघाच्या कार्यकर्त्यांच्या चिकाटीबाबत भाष्य केले होते. त्यात संघाबाबत काहीच म्हटले नव्हते, असे म्हणत पवारांनी आपल्याच विधानावरून घुमजाव केले. पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. काही केले किवा न केले तरी मोदी हे अवास्तवपणे सांगतात. काहीही केले तरी त्याचे उदोउदो केलेले आपल्याला आवडत नाही, असे टोला त्यांनी लगावला.

भोसरीमध्ये पदाधिकाऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले होते. स्वयंसेवक ज्याप्रमाणे जनसंपर्क साधतात त्याप्रमाणे चिकाटी असायला हवी. जर स्वयंसेवक ५ घरांमध्ये प्रचार करण्यासाठी गेले आणि त्यातील एक घर बंद असेल तर ते पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या घरात जातात, असे उदाहरणही यावेळी पवारांनी दिले.