कमाल झाली …! आता पाठ्यपुस्तकात आरएसएसच्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या योगादानातील धडे

टीम महाराष्ट्र देशा : नागपूर विद्यापीठाकडून बी. ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमातील एक बदल धक्कादायक आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या इतिहासाचा समावेश केला आहे. 1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा समावेश आहे. हा भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

आतापर्यंत कोणत्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आरआरएसच्या इतिहासाचे धडे दिले गेले नाहीत. मात्र नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात आरएसएसच्या इतिहासाचे धडे घेतल्याने महाराष्ट्रातील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.Loading…
Loading...